अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :- श्री साईबाबा संस्थानवर राज्य सरकारने नेमलेल्या नवीन विश्वस्त मंडळाला औरंगाबाद हायकोर्टाने स्थगिती दिल्याची माहिती याचिकाकर्ते उत्तमराव शेळके पा., संजय काळे, संदीप कुलकर्णी यांनी दिली.
श्री साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ नुकतेच ठाकरे सरकारने जाहीर केले. त्यात सर्व राजकीय पदाधिकाऱ्यांना संधी देण्यात आली.
श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेसाठी घालून देण्यात आलेल्या घटनेच्या नियमांची हे नवीन विश्वस्त मंडळ नेमताना पायमल्ली करण्यात आली
राजकीय नेत्यांनी तसेच सरकारमधील सत्ताधाऱ्यांनी आपल्या बगलबच्च्यांना तसेच नातेवाईकांना खूष करण्यासाठी राजकीय पुनर्वसन करण्यासाठी पदांची खिरापत वाटली.
त्यातून शिर्डी येथील साईभक्त उत्तमराव शेळके पाटील, संजय काळे, संदिप कुलकर्णी यांनी दिवाणी अर्ज औरंगाबाद उच्च न्यायालयात दाखल केला होता.
त्यावर आज मंगळवारी सुनावणी होवून न्यामूर्ती घुगे यांच्या खंडपीठाने नवीन नेमण्यात आलेल्या विश्वस्त मंडळाला स्थगिती दिली आहे.
आणि त्या समितीलाही धोरणात्मक व आर्थिक बाबीसंबंधी उच्च न्यायालयाच्या परवानगीशिवाय निर्णय घेता येणार नाही.
श्री साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ स्व.ससाणे यांची दुसर्यांदा निवड झालेली उच्च न्यायालयात रद्द झाल्यापासून न्यायालयातच ओढले जात आहे. तरीही राज्यसरकारला सद्बुद्धी येत नाही हे विशेष होय.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम