शेअर मार्केटचं वेड लागलेल्या ‘त्या’ तरुणास अखेर झाली अटक !

Ahilyanagarlive24 office
Published:

आपल्याच जन्मदात्या आईची हत्या तसेच वडिलांवर प्राणघातक हल्ला करून फरार झालेल्या मुलाला तब्बल अडीच वर्षानंतर बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. थेट पश्चिम बंगालमधून या आरोपीला अटक करण्यात आलंय.

अटक आरोपीला वसई न्यायालयाने 25 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. जन्मेश पवार असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे

मिळालेल्या माहितीनुसार आरोपी जन्मेश पवार आई नम्रता पवार (वय 50) तसेच नरेंद्र पवार (वय 53) हे कुटुंब नालासोपारा पश्चिम पाठणकर पार्क येथील इंपेरियल टॉवरमध्ये राहत होते.

जन्मेश हा नम्रता आणि नरेंद्र पवार यांचा एकुलता एक मुलगा आहे. तो शेअर मार्केटमध्ये पैसे लावत होता, पण यामध्ये त्याला यश येत नव्हते.

शेअर मार्केटिंकमध्ये पैसा गुंतवल्यामुळे त्याचे मोठे नुकसान झाले होते आपल्या हातून मोठा गुन्हा घडल्याचे समजताच आईचा मृतदेह आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या वडिलांना राहत्या घरातच सोडून आरोपी जन्मेश घटनास्थळावरुन पसार झाला होता.

आरोपी इतका हुशार होता कि घटना घडल्यानंतर कोणताही पुरावा न सोडता तो बॅग घेऊन पळून गेला होता. त्यानंतर हत्या, प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तब्बलअडीच वर्षांपासून पोलीस या आरोपीचा सोध घेत होते. आरोपीने कोणताही सोडला नसल्याने त्याला पकडणे कठीण जात होते.

शेवटी आरोपी जन्मेश हा पश्चिम बंगाल येथे असल्याची गोपनीय माहिती तपास पथकाला मिळाली होती. त्यानंतर वरिष्ठांच्या आदेशावरून सर्व तांत्रिक बाबींचा वापर करून आरोपीला मोठ्या शिताफीने अटक केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe