अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :- जगभरात गेल्या जवळपास दोन ते दीड वर्षांपासून कोरोनाने थैमान घातलं आहे. भारतात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच तज्ज्ञांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा दिला असून सावधनता बाळगण्याचा इशारा दिला आहे.
असं असताना खासदार उदयनराजे भोसले यांनी मात्र कोरोनाबाबत एक अजब वक्तव्य केलं आहे. ‘कोरोना हा आपल्या जन्माच्या अगोदर पासून होता, आहे आणि असाच राहणार आहे’

कोणी जाणार जरी म्हटलं तरी कोरोना जाणार नसल्याचं उदयनराजे यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कॉम्रेड सोशल ऑर्गनायझेशनच्यावतीने आंदोलन करण्यात आलं. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षापासून सैनिक भरती झालेली नसून शासनाने भरती साठीची मर्यादा वर्षे वाढवून द्यावी या मागणीसाठी हे आंदोलन झालं.
यावेळी उदयनराजे यांनी अचानक आंदोलनस्थळी भेट देवून मार्गदर्शन करताना हे वक्तव्य केलं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलनाला खा.श्री.छ. उदयनराजे भोसले यांनी भेट देवून त्यांच्या मागण्यासंदर्भात चर्चा केली.
यावेळी पत्रकारांशी बोलताना खा. उदयनराजे भोसले म्हणाले,अतिरिक्त जिल्हाधिकार्यांशी चर्चा करून विषय समजावून घेतला आहे. सैन्य भरतीसंदर्भात जिल्हा प्रशासनाच्या हातामध्ये काही नाही.
तुमच्या मागण्यांचे निवेदन सदन कंमाड किंवा भरती प्रकियेशी संबंधित यंत्रणेपर्यंत पोहोचवण्याचे जिल्हा प्रशासन करेल. या तुमच्या अडचणी फक्त तुमच्यापुरत्या मर्यादीत नाहीत त्यासाठी दोन वर्षापूर्वीच तुम्ही मला का भेटला नाही. याप्रश्नी आता लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही खा. उदयनराजेंनी दिली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम