अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :- अकोले तालुक्यातील भंडारदऱा धरणाजवळील शेंडी ते वारंघुशी फाटा रस्त्यावर चिंचोडी गावाजवळ एका चारचाकी अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरून येणाऱ्या ट्रिपल सीटमधील एक जण जागीच ठार झाले, तर दोघे जखमी झाले.
या अपघातात अकोले तालुक्यातील मुरशेत येथील दुचाकीस्वार अशोक धोंडू इंदोरे हा तरुण जागेवरच ठार झाला. दुचाकीवर पाठीमागे बसलेले वारंघुशी येथील दोघेजण गंभीर जखमी झाले.

भंडारदऱ्याकडे वारंघुशी फाट्याकडून येणाऱ्या रस्त्यावरून चिंचोडी गावाजवळ एकाच दुचाकीवरून तीन जण प्रवास करत होते.
मात्र चिचोंडी गावच्या मागेच वाकीफाटा वळणावर या दुचाकीस समोरून भरधाव आलेल्या एका अज्ञात चार चाकी वाहनाने जोराची धडक देऊन अपघात घडला.
अपघाताचा आवाज ऐकून आजूबाजूच्या परिसरातून घरातील व शेतात काम करीत असलेले लोक जमा झाले. मात्र तोपर्यंत धडक दिलेले वाहन घेऊन चालक फरार झाला होता. या अपघातात मुरशेत येथील अशोक धोंडू इंदोरे हा तरुण जाग्यावरच मृत पावला.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम