दुर्दैवी घटना: विजेचा शॉक लागून पती – पत्नीचा मृत्यू…! ‘या’ तालुक्यातील घटना

Published on -

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- कपडे सुकायला टाकत असलेल्या पत्नीला विजेचा शॉक बसल्याने ती जोरात ओरडली त्यामुळे मदतीसाठी गेलेल्या पतीला देखील विजेच्या जबर धक्का बसून पती – पत्नीचा मृत्यू झाला.

ही दुर्दैवी घटना पाथर्डी तालुक्यातील सांगवी खुर्द येथील सांगवी-साकेगाव रस्त्याला कटारनवरे वस्तीवर घडली. शोभा मच्छिंद्र कटारनवरे व मच्छिंद्र कोडींबा कटारनवरे असे या घटनेत मृत झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सांगवी खुर्द येथील कटारनवरे वस्तीवर शोभा मच्छिंद्र कटारनवरे (वय-४० वर्षे) या धुणे वाळायला टाकत होत्या.

त्यावेळी त्यांना विजेचा शॉक बसला व त्या जोरात ओरडल्या त्यामुळे त्यांचे पती मच्छिंद्र कोंडीबा कटारनवरे (वय-४३ वर्षे) हे त्यांच्या मदतीला धावले.

मात्र या दोघांनाही विजेचा शाँक बसला आणि ते जागीच मरण पावले. कटारनवरे यांचा मुलगा होमगार्डमधे जवान म्हणुन काम करीत आहे. सांगवी गावावर शोककळा पसरली. या दाम्पत्यावर गावातच अंतीम संस्कार करण्यात आले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News