कारखाना विक्री घोटाळ्याप्रकरणी भाजपनेते किरीट सोमय्या गुरुवारी पारनेरला येणार

Published on -

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील पारनेर सहकारी साखर कारखान्याच्या विक्री व्यवहाराची चौकशी व पाहणी करण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या गुरुवारी पारनेरला भेट देणार आहेत.

दरम्यान नगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रिफांवर आरोप केल्यानंतर सध्या सोमय्या चर्चेचे केंद्रबिंदू बनलेले आहे. यातच त्यांचा आता पारनेर दौरा हा विशेष चर्चेचा ठरणार आहे.

क्रांती शुगरकडे पैसे नसतानाही ३२ कोटींना हा कारखाना कसा विकत घेतला असा प्रश्न उपस्थित करत सहकारी बँकेने कारखाना विक्रीची प्रक्रिया संशयास्पदरित्या राबवली असल्याचा आक्षेप बचाव समितीचा आहे.

या कारखाना विक्रीतील भ्रष्टाचाराबाबत खंडपीठातही तीन याचिका दाखल आहेत. दरम्यान कारखाना विक्री प्रक्रियेत झालेल्या घोटाळ्याची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी करावी अशी मागणी कारखाना बचाव समितीने सक्तवसुली संचालनालयाकडे केली आहे.

समितीच्या प्रतिनिधींनी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड व ईडीचे मुख्य संचालक संजय मिश्रा यांची दिल्ली येथे भेट घेतली होती.

त्यानंतरच हालचालींना वेग आला. सोमय्या कारखाना स्थळावर सभासद व शेतकऱ्यांशी संवाद साधतील. नंतर ते पारनेर येथे येतील. पुरावे देऊन ईडीकडे पाठपुरावाही केला होता. मात्र त्याची दखल न घेतल्यामुळे ईडीविरोधात मुंबई येथे २० ऑक्टोबरपासून उपोषणाचा इशारा बचाव समितीने दिला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News