अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- पोखर्डी येथील स्वस्तधान्य दुकानदार बबन ठकाराम बानकर (वय 49) यांचे नुकतेच हृदयविकराने निधन झाले. बबन बानकर हे धार्मिक व मनमिळावू वृत्तीचे होते.
त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.स्वस्तधान्य दुकानामुळे त्यांचा समाजामध्ये मोठा जनसंपर्क होता. त्यांच्या मागे आई,
वडील, भाऊ, पत्नी, मुलगा, एक मुलगी, जावई असा परिवार आहे. प्रगतिशील शेतकरी पंडित बानकर यांचे ज्येष्ठ बंधू तर अभिषेक बानकर यांचे ते वडील होत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम