शिक्षिकेचे धूमस्टाईलने मिनी गंठण लांबविले

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- कोपरगाव शहरात चोऱ्यांचे सत्र सुरू झाले आहे. शहरातील डॉ.सी.एम.मेहता कन्या विद्यालयात दुचाकीवर आलेल्या दोघा अज्ञात चोरट्यांनी 15 ग्रॅम वजनाचे साठ हजार रुपये किंमतीचे मिनी गंठण धूमस्टाईलने लांबविल्याची घटना बुधवारी (ता.22) सकाळी सव्वा नऊ वाजेच्या सुमारास घडली आहे.

याबाबत शहर पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, शहरातील डॉ.सी.एम.मेहता कन्या विद्यालयात शिक्षिका संगीता गणेश देशमुख (वय 54) या दुचाकी उभी करत असताना पाठीमागून काळ्या रंगाच्या दुचाकीवरुन आलेल्या दोघा अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 15 ग्रॅम वजनाचे साठ हजार रुपये किंमतीचे मिनी गंठण धूमस्टाईलने लांबवून पोबारा केला.

याबाबत शिक्षिका संगीता देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन दोघा अज्ञात चोरट्यांविरोधात गुरनं.293/2021 भादंवि कलम 392, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे हे करत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe