कोरोनासाठी तयार केलेली लस ठरतेय कॅन्सरवरही प्रभावी

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :- कोरोनाची साखळी तोडण्यासाठी देशभरात मोठ्या प्रमाणावर लसीकरण केले जात आहे. यातच वाढती लोकसंख्या पाहता अनेक लसींना परवानगी देण्यात आली आहे.

यातच आता एक महत्वाची माहिती समोर येत आहे. ती म्हणजे कोरोनाला प्रतिबंधात्मक म्हणून तयार करण्यात आलेली लस हि कॅन्सरवर प्रभावी ठरत असल्याचे दिसून आले आहे.

कॅन्सरग्रस्त लोकांसाठी कोविशिल्ड, मॉडर्ना आणि फायजर या कोरोना लसी प्रभावी ठरणार आहे, त्याचे काहीही साईड इफेक्टही नाही आहेत. त्यामुळे आता कॅन्सरपिडीतांना दिलासा मिळाला आहे. वैज्ञानिकांनी यूरोपियन सोसाइटी अॉफ मेडिकल ऑन्कोलॉजी समोर आपली याबाबत काही निरिक्षणं नोंदवली आहेत.

त्यात कोरोना लस हा कोणत्याही धोक्याशिवाय कॅन्सर पिडीतांना उपयोगी ठरत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. या सर्वेक्षणातून कोरोना लस ही कॅन्सर साठीही परिणामकारक ठरत असल्याची माहिती समोर आली आहे. संशोधकांनी या संशोधनासाठी नेदरलंडमधील विविध रुग्णालयातील 792 कॅन्सर पिडीत रूग्णांवर कोरोना लसीचे संशोधन केले होते.

त्यात त्यांना काही सकारात्मक परिणाम जाणवले. त्यामुळे आता कोरोनाच्या सर्व लसी या कॅन्सरवरही तारक ठरणार आहे. दरम्यान कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता तसेच पहिली व दुसरी लाट येऊन गेली असून

तिसर्या लाटेची शक्यता पाहता भारतात लसीकरण मोहीम युद्धपातळीवर सुरु करण्यात आले आहे. यामुळे रुग्णसंख्येत देखील गेल्या काही दिवसांपासुन घट होताना दिसून येत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe