अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :- वाढत्या कोरोना रुग्णाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील आरोग्य यंत्रणे सह सर्व प्रशासकीय यंत्रणा आपल्या जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पणे अहोरात्र रुग्णाची सेवा करतांना दिसून येत आहे.
यातच तालुक्यातील शिंगणापूर येथील डॉ विजय काळे यांनी आपल्या आई च्या १६ व्या वर्षश्राद्ध निमित्त गुरूवार दि २३ सप्टेंबर २०२१ रोजी दिवस भर आपल्या शिंगणापूर येथील श्रद्धा क्लिनिक मध्ये येणाऱ्या रुग्णांची मोफत तपासणी
व वैद्यकीय मार्गदर्शन करत सुमारे ७० ते ७५ पेशंट ची मोफत तपासणी करून कोरोना काळात माणुसकीचे एक अनोखे उदाहरण समाजापुढे मांडले आहे.
डॉ काळे यांच्या मातोश्री कालकथित छबुबाई दादा काळे यांचे निधन २३ सप्टेंबर २०१५ रोजी झाले. कै छबुबाई यांनी काबाड कष्ट करत आपल्या तिन्ही मुलांना उच्च शिक्षित केले.
त्यांचा स्मुर्ती दिनी दरवर्षी डॉ काळे हे आई चा वर्षश्राद्ध चा कार्यक्रम न करता घरगुती पध्दतीने आई च्या फोटो ची पूजा करत आईचे ऋण म्हणून गेल्या सोळा वर्षा पासून आपल्या श्रध्दा क्लीनिक मध्ये दिवसभर येणाऱ्या पेंशट ची मोफत तपासणी करत असतात.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर देखील न घाबरता डॉक्टर काळे यांनी आपला मोफत उपचाराचा उपक्रम नियमित सुरू ठेवल्याने तपासणी केलेल्या अनेक पेशंट यांनी डॉक्टरांचे आभार व्यक्त केले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम