अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :- सन २०१७ मध्ये नगर शहरात दरोडा टाकण्यासाठी येत असलेल्या टोळीतील फरार आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे.
सागर गोरख मांजरे (रा. उक्कलगाव, ता. श्रीरामपूर) असे त्याचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात चोरीचे दहा गुन्हे दाखल आहेत.
सागर मांजरे हा त्याच्या ७ साथीदारासह दरोड्याची तयारी करुन अहमदनगर शहरामध्ये कोठेतरी दरोडा घालण्यासाठी येत होता.
त्यावेळी हत्यारे व वाहनासह मिळून आल्याने या घटनेबाबत तोफखाना पोलिस स्टेशांमध्ये येथे गुन्हा दाखल केलेला होता. त्याला राहत्या घरातून ताब्यात घेतले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम