आज ६३३ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ६३० बाधितांची रुग्ण संख्येत भर

Published on -

अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :-  जिल्ह्यात आज ६३३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख २९ हजार २१५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.५८ टक्के इतके झाले आहे.

दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ६३० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४ हजार ८८८ इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १११, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २७९ आणि अँटीजेन चाचणीत २४० रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये अकोले ०१, जामखेड १०, कर्जत ०१, नगर ग्रामीण ०९, नेवासा ०३, पारनेर १९, पाथर्डी १३, राहुरी ०२, संगमनेर ०५, श्रीगोंदा ३८, कॅंटोन्मेंट बोर्ड ०३, मिलिटरी हॉस्पिटल ०१ आणि इतर जिल्हा ०६ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १६, अकोले ०९, जामखेड ०२, कर्जत ०९, कोपरगाव ०२, नगर ग्रा.१७, नेवासा २७, पारनेर १२, पाथर्डी ०४, राहाता ४२, राहुरी १४, संगमनेर ३५, शेवगाव ३१, श्रीगोंदा ०८, श्रीरामपूर ४३ आणि इतर जिल्हा ०८ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज २४० जण बाधित आढळुन आले. मनपा ०३, अकोले २६, जामखेड ०९, कर्जत ३३, कोपरगाव ११, नगर ग्रा. ०७, नेवासा २१, पारनेर २२, पाथर्डी १४, राहाता ०९, राहुरी ११, संगमनेर ६४, शेवगाव ०२, श्रीगोंदा ०३, श्रीरामपुर ०३ आणि इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा २७, अकोले ३१, जामखेड १२, कर्जत ३३, कोपरगाव १३, नगर ग्रा. ५८, नेवासा २३, पारनेर ८७, पाथर्डी ३३, राहाता ६३, राहुरी २६, संगमनेर १०१, शेवगाव २५, श्रीगोंदा ७४, श्रीरामपूर १३, कॅंटोन्मेंट बोर्ड ०१ आणि इतर जिल्हा १३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

बरे झालेली रुग्ण संख्या:३,२९,२१५

उपचार सुरू असलेले रूग्ण:४८८८

पोर्टलवरील मृत्यू नोंद:६७७४

एकूण रूग्ण संख्या:३,४०,८७७

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe