अहमदनगर Live24 टीम, 24 सप्टेंबर 2021 :- राज्यात आता डेंग्यूच्या एका नव्या व्हेरियंटनं डोकं वर काढलं आहे. या व्हेरियंटबाबत तज्ज्ञांनी सावधगिरीचा इशारा दिला आहे. डेंग्यूचा नवा व्हेरिएंट जीवघेणा आहे.
देशात कोरोनाची लाट काहीशी आटोक्यात येत असतानाच डेंग्यूचा धोका वाढत असल्याचं चित्र आहे. डेंग्यूचा DENV-2 हा नवा व्हेरियंट जास्त धोकादायक असल्याचं समोर आलं आहे.
दरम्यान महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, तेलंगणा, केरळ, ओडिशासह 11 राज्यांमध्ये या नव्या व्हेरियंटचे रुग्ण आढळून आलेत. एरवीही पावसाळ्यात डेंग्यूचे रुग्ण आढळतात.
मात्र यावेळी प्रमाण जास्त असल्यामुळे चिंता वाढली आहे. डेंग्यू व्हायरस साधारणतः चार रुपांमध्ये आढळून येतो. याला D1, D2, D3 आणि D4 अशी नावं आहेत. यातल्या DENV-2 किंवा स्ट्रेन D2 मध्ये कोविडसारखे काही गुणधर्म त्याला धोकादायक बनवतात.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम