अहमदनगर Live24 टीम, 24 सप्टेंबर 2021 :- नगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षामध्ये बदली करण्यात आली आहे.
त्यांच्या जागेवर सध्या बेलवंडीचे पोलिस निरीक्षक संपत शिंदे यांना कार्यभार देत असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली. पोलिस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या नंतर कोतवाली पोलिस ठाण्याच्या निरीक्षकपदी राकेश मानगावकर यांची नियुक्ती करण्यात आली होती.
कोतवाली पोलिस ठाण्याच्या आधी मानगावकर हे कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचा कारभार पाहत होते. सुमारे आठ महिन्यांपूर्वी अधीक्षक पाटील यांनी मानगावकर यांना कोतवाली पोलिस ठाण्यात नियुक्ती दिली होती. पोलिस अधीक्षक पाटील यांनी मानगावकर यांची अचानक नियंत्रण कक्षात बदली केली आहे.
त्यानंतर मानगावकर सध्या रजेवर गेले आहेत. त्यामुळे तोफखाना पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्याकडे तात्पुरता कोतवालीचा चार्ज देण्यात आला होता. दरम्यान आता कोतवालीचे निरीक्षक मानगावकर यांच्या जागेवर आता पोलिस निरीक्षक संपत शिंदे यांच्याकडे कार्यभार देण्यात येत असल्याचेही अधीक्षक पाटील यांनी सांगितले.
नगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षामध्ये बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर सध्या बेलवंडीचे पोलिस निरीक्षक संपत शिंदे यांना कार्यभार देत असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.
पोलिस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या नंतर कोतवाली पोलिस ठाण्याच्या निरीक्षकपदी राकेश मानगावकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. कोतवाली पोलिस ठाण्याच्या आधी मानगावकर हे कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचा कारभार पाहत होते. सुमारे आठ महिन्यांपूर्वी अधीक्षक पाटील यांनी मानगावकर यांना कोतवाली पोलिस ठाण्यात नियुक्ती दिली होती.
पोलिस अधीक्षक पाटील यांनी मानगावकर यांची अचानक नियंत्रण कक्षात बदली केली आहे. त्यानंतर मानगावकर सध्या रजेवर गेले आहेत. त्यामुळे तोफखाना पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्याकडे तात्पुरता कोतवालीचा चार्ज देण्यात आला होता.
दरम्यान आता कोतवालीचे निरीक्षक मानगावकर यांच्या जागेवर आता पोलिस निरीक्षक संपत शिंदे यांच्याकडे कार्यभार देण्यात येत असल्याचेही अधीक्षक पाटील यांनी सांगितले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम