अहमदनगर Live24 टीम, 24 सप्टेंबर 2021 :- कर्जतच्या पोलिस ठाण्यात चंद्रशेखर यादव यांनी पोलिस निरीक्षक पदाचा पदभार स्विकारला आणि पोलिस व नागरीक हा समन्वय साधला गेला.
पोलिसांच्या अखत्यारीत असलेल्या कामांव्यतिरिक्त त्यांनी मार्गी लावलेल्या अनेक कामांमुळे कर्जत तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये विश्वास निर्माण झाला आहे.शासकीय यंत्रणांनाही न सुटलेले जमिनीच्या बांधापासुन ते वैयक्तिक वादापर्यंतचे अनेक दशकांचे जुने वाद मार्गी लावून सर्वसामान्यांच्या गळ्यातील ताईत ठरलेले चंद्रशेखर यादव हे पहिले उपक्रमशील पोलीस अधिकारी ठरले आहेत.
कर्जत येथील गेली ३१ वर्षांपाऊन रखडलेल्या एका प्लॉटचा व्यवहार पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मध्यस्तीने मिटला आहे.शहरातील एका व्यक्तीने पत्रकार सुभाष पंढरीनाथ माळवे (रा. कर्जत) यांच्याकडुन ठरलेली रक्कम घेऊन तुम्हाला एक प्लॉट देतो म्हणून १९९० साली स्टँप पेपरवर (मुद्रांकावर) लिहून दिले होते.
माळवे यांची परिस्थितीही हलाखीची असल्याने त्यांनी मोठ्या कष्टाने ही रक्कम जुळवून प्लॉटसाठी दिली होती. परंतु संबंधित व्यक्तीने त्या काळी तो प्लॉट काही अडचणींमुळे दिला नाही.पत्रकार माळवे यांनी वेळोवेळी मागणी केली,पाठपुरावा सुरू ठेवला मात्र त्यांच्या या मागणीला जुमानले नाही.
आता या प्रश्नाला न्याय पोलिस निरीक्षक यादव हेच मिळवून देतील अशी आशा बाळगत माळवे यांनी सर्व हकीगत यादव यांना सांगितली. त्यांनी या प्रकरणात लक्ष घालुन लागलीच त्यांनी दोन्हीही व्यक्तींना पोलीस ठाण्यात बोलावले.त्यांच्यात मध्यस्ती करत समन्वय घडवून आणला आणि पत्रकार माळवे
यांना ४ लाख ५० हजार रुपये देण्याचे ठरवून तब्बल ३१ वर्षांचा वाद आता कायमचा मिटला आहे.तीन दशके रेंगाळत पडलेला वाद पोलिस निरीक्षकांमुळे मिटल्याने दोघांनीही त्यांचे विशेष आभार मानले. दरम्यान पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष मोतीराम शिंदे पत्रकार अफरोज पठाण, मुन्ना पठाण, मच्छिंद्र अनारसे हे उपस्थित होते.
यादव यांच्यामुळे उपेक्षितांना खरा न्याय! गेली अनेक वर्षांपासुन प्रलंबित असलेली व वादाच्या भोवऱ्यात अडकलेली कामे मार्गी लावण्यात पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यशस्वी ठरले आहेत. त्यांनी राबवलेल्या समाजपयोगी उपक्रमांमुळे गोरगरीब,सर्वसामान्य व उपेक्षितांना खरा न्याय मिळत असल्याची जनभावना कर्जत शहरातील पत्रकारांनी व्यक्त केली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम