UPSC Result 2021 : अंतिम निकाल झाला जाहीर ,अहमदनगर जिल्ह्यातील या मुलांचे यश…

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 24 सप्टेंबर 2021 :- UPSC नागरी सेवा परीक्षा 2020 चा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. यावेळी एकूण 761 उमेदवारांची नियुक्तीसाठी शिफारस करण्यात आली आहे.

या परीक्षेत विनायक नरवडे, विकास बी पालवे आणि अभिषेक दुधाळ या नगर जिल्ह्यातील तिघांनी यश मिळवले आहे. नगर शहरातील गुलमोहोर रोडवर राहणाऱ्या विनायक नरवडे याने या परीक्षेत ३७ वी रँक मिळवली आहे.

अभिषेक दिलीप दुधाळ याने युपीएससी परीक्षेत सलग दुसऱ्यांदा यश मिळविले आहे. अभिषेक हा बेलापूर (ता. श्रीरामपूर) येथील असून, त्याला ४६९ वी रॅंक मिळाली आहे. विकास बी पालवे हे मुळचे सोनई (ता.नेवासा) येथील आहेत.

व्हिआयटी पुणे येथून विकास याने २०१६ मध्ये इंजिनीअरिंग पूर्ण केले. चौथ्या प्रयत्नात त्याला या परीक्षेत यश मिळाले असून त्याने ५८७ वी रँक मिळवली आहे.

यूपीएससीने जारी केलेल्या माहितीनुसार, नागरी सेवा परीक्षा (मुख्य) जानेवारी 2021 मध्ये घेण्यात आली. या परीक्षेत यशस्वी उमेदवारांची मुलाखत ऑगस्ट-सप्टेंबर 2021 मध्ये पूर्ण झाली आहे.

ज्या उमेदवारांची नावे मुलाखतीनंतर निवड यादीत आली आहेत त्यांचे रोल नंबर UPSC च्या वेबसाइट https://www.upsc.gov.in/ वर पाहिले जाऊ शकतात. उमेदवार येथे दिलेल्या लिंकवर त्यांचा निकाल देखील तपासू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!