अबब! चक्क वीस लाखांची वीजचोरी वीज कंपनीकडून ‘ही’ कारवाई

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :-अलीकडच्या काळात कोण काय करेल याचा अंदाज लावणे खूप कठीण आहे. नुकताच येथील मार्केट यार्डमधील एका गाळाधारकाने वीज मीटरमध्ये फेरफार करून तब्बल वीस लाखांची वीजचोरी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आली आहे.

हा प्रकार लक्ष्यात येताच महावितरण कंपनीच्या भरारी पथकाने कारवाई करत याप्रकरणी काल कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मार्केटयार्ड मधील भाजीपाला विभागातील मचिंद्र रामभाऊ ताठे यांच्या गाळ्यातील मीटरची तपासणी केली होती.

सदरच्या गाळ्याचा वापर संतोष राजू ढवळे हे करत असल्याचे यावेळी या पथकाला सांगण्यात आले होते. गाळ्यातील मीटर हे नॉट डिस्प्ले होते. त्यामुळे सदरचे मीटर तपासणीसाठी काढून मीटर चाचणी कक्षात पाठविण्यात आले होते.

सदर मीटरची १७ सप्टेबर रोजी दुपारी तपासणी केली असता मीटरच्या खालील बाजूस टर्मीनल जवळ १ छिद्र पाडलेले दिसले व मीटरमध्ये फेरफार करुन वीज चोरी केली जात असल्याचे दिसून आले.

सदरची वीज चोरी ही ऑगस्ट २०१७ पासून करण्यात आलेली असून त्याची युनिट संख्या ९४ हजार ७३४ एवढी होते. या वीज चोरीची एकूण किंमत १९ लाख ६५ हजार ९२० होत असून तडजोडीची रक्कम ४५ हजार इतकी आहे.

सदरची रक्कम भरण्यासाठी ढवळे यांना आठवडाभराचा कालावधी दिला होता. मात्र त्यांनी या कालावधीत वीज चोरीसह तडजोडीची रक्कम न भरल्यामुळे भरारी पथकाचे प्रमुख प्रदीप सावंत यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात जावून याबाबत फिर्याद दिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe