अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :- कर्जबाजारीपणाला कंटाळून एका युवा शेतकऱ्याने घरासमोरील पडवीत गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली आहे. ही घटना पाथर्डी तालुक्यातील वैजुबाभूळगाव येथे घडली.
येथील शेतकरी राजू आसाराम घोरपडे असे त्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे. रात्री घरासमोरील पडवीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे.

याबाबत पाथर्डी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, राजू घोरपडे यांनी सेवा संस्थेसह, बँका व खाजगी फायनान्स कंपन्यांचे देखील कर्ज घेतले होते.
मात्र गेल्या दोन वर्षापासून सुरू असलेली कोरोना व नैसर्गिक आपत्तीमुळे घोरपडे यांना कर्जाचे हप्ते वेळेवर फेडणे शक्य झाले नाही.
त्यामुळे संबंधितांकडून कर्ज वसुलीसाठी घोरपडे यांच्याकडे वारंवार तागदा होत असल्याचे घोरपडे यांच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात आले आहे.
त्यानंतर सोमवारी रात्री दोरीने गळफास घेतला व आपले जीवन संपवले. घरातील कुटुंबीयांनी तात्काळ त्यांना नगरच्या सरकारी रुग्णात हलवले
परंतु रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई,वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम