तलवार घेऊन दहशत पसरवणाऱ्या दहा जणांवर गुन्हा, चार अटकेत

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :- कोल्हार भगवतीपूर येथे तलवार घेऊन दहशत पसरवणाऱ्या दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चार जणांना अटक केली आहे, अशी माहिती पोलिस सुत्रांनी दिली.

ही घटना गुरुवारी अंबिका नगरमध्ये घडली होती. हातात तलवारी घेऊन खुलेआम फिरणे, गावात दहशत निर्माण करणे अशा प्रकारच्या घटना कोल्हारमध्ये घडत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

या प्रकाराला वेळीच आवर न घातल्यास कोल्हारचे बिहार व्हायला वेळ लागणार नाही, अशी भीती जाणकारांनी व्यक्त केली आहे. कोल्हार सारख्या ग्रामीण भागात तलवारी आल्या कुठून याबाबत नागरिकांमध्ये उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे.

या प्रकरणी जब्बार एजाज खान, अफरोज असलम शेख, सलमान चांद खान, आबीद जमशेद सय्यद, शाहरुख चांद,शेख यांच्यावर अवैध शस्त्रसाठा बाळगल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले,

तर अमोल शंकर बर्डे, कार्तिक शंकर बर्डे, विशाल भाऊसाहेब बर्डे, मुकुंद शिवाजी गांगुर्डे आदींवर दंगलींचे गुन्हे दाखल करण्यात आले, अशी माहिती लोणी पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक समाधान पाटील यांनी दिली.

दरम्यान, शुक्रवारी सकाळी लोणी येथील पोलिस चौकीत हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने लोणी पोलिस स्टेशनमध्ये मोर्चा काढून या प्रकाराचा निषेध करण्यात आला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe