अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :- संगमनेरातील शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने बेकायदेशीररित्या दारिद्र्य रेषेखालील शिधापत्रिकेचा वापर विविध शासकीय लाभ मिळविण्यासाठी केला असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
याबाबत भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष अॅड. श्रीराम गणपुले यांनी तहसीलदारांकडे तक्रार केली असून शिवसेनेच्या सदर पदाधिकाऱ्यावर शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे.

file photo
या तक्रारीमुळे शहरामध्ये खळबळ उडाली आहे. संगमनेर तालुक्यात शिधापत्रिकेचा मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वापर सुरू आहे. पात्रता नसतानाही अनेक जणांनी खोटे कागदपत्र सादर करून दारिद्र्य रेषेखालील शिधापत्रिका काढल्या आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम