अहमदनगर Live24 टीम, 26 सप्टेंबर 2021 :-चोरी करण्यासाठी चोरटे काय करतील ते सांगता येत नाही. श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथे चोरट्यांनी घरात असलेल्या लग्नाच्या अल्बमधील महीलांच्या गळ्यातील सर्व दागिने व त्या महिलांकडून काढून घेण्याची घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील खंडागळे यांचा बंगल्यात काल पहाटे दीड वाजेच्या सुमारास चोरट्यांनी बंगल्याचा मुख्य दरवाजा तोडून आत प्रवेश केला.
घरात असलेल्या लहान मुलीच्या गळ्याला चाकु लावल्याने घरातील सर्वजण घाबरले. त्यानंतर चोरट्यांनी घरात सर्वत्र उचकापाचक केली. त्यांच्या घरातील लग्नाचा अल्बमही चोरट्यांनी पाहिला.
त्यातील घरातील महिलांचे फोटो शोधुन फोटोत अंगावर घातलेले दागिने लवकर काढुन द्या असे सांगत जवळपास साडेतेरा तोळे सोने व १० हजार रुपये रोख रक्कमलांबविली.
त्यानंतर भगीरथ चिंतामणी यांच्या घराचे लोखंडी दरवाजाचे कुलुप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. त्यांच्या घरातून २५ हजार रुपये रोख लांबविले.
चिंतामणी यांचा मुलगा सोमनाथ याने एका चोरट्यांशी झटापट केली. त्यात त्याच्या पायावर चोरट्यांनी लोखंडी रॉडने मारहाण केली. सोमनाथने देखील त्या चोरट्याला चांगलेच धुतले.
त्याने चोरट्याला पकडले होते मात्र यावेळी गडबड झाली व चोरट्यांनी तेथुन पळ काढला. या घटनेनंतर या भागातील रहिवाशांनी पोलिसांना फोन करताच काही मिनिटातच बेलापूर पोलीस घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत चोरटे पसार झाले होते.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम