अहमदनगर Live24 टीम, 26 सप्टेंबर 2021 :- पहाटे फिरायला गेलेल्या महिलेवर अज्ञात व्यक्तीने हल्ला करून जखमी केल्याची घटना पारनेर तालुक्यातील भाळवणी-जामगाव रोड परिसरात घडली आहे. शैला दत्तू भोसले असे जखमी महिलेचे नाव आहे.
भोसले यांच्या डोक्यावर टणक हत्याराने वार करत जखमी केले आहे. दरम्यान या घटनेनं ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, दररोज पहाटे गावातील पुरुष, महिला, तरुण गावालगतच्या जामगाव रोड, टाकळी ढोकेश्वर रोड, नगर रोड परिसरात फिरण्यासाठी (मॉर्निंग वॉक) जात असतात.
रोजच्या प्रमाणे भोसले या पहाटे जामगाव रोडच्या परिसरात फिरण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी अंधाराचा फायदा घेऊन अचानक अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर हल्ला करून जखमी केले.
त्यामुळे फिरायला जाणार्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून नगर जिल्ह्यातील गुन्हेगारीमध्ये कमालीची वाढ झाली आहे. यामुळेच अशा घटना घडू लागल्या आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम