अहमदनगर Live24 टीम, 26 सप्टेंबर 2021 :- मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४५,२४० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर कमी झाला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ४६,२४० प्रति १० ग्रॅम आहे.
पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४४,४४० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४७,५८० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४५,२४० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४६,२४० रुपये इतका असेल. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ६०६ रुपये आहे.
भारतात आता सणासुदीचा काळ सुरु झाला आहे. सध्या सोन्याचा दर गेल्या 6 आठवड्यांतील नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. कॉमेक्सवरील सोन्याची सध्याची किंमत $ 1750 च्या पातळीवर आली आहे, तर दुसरीकडे, MCX वर सोन्याची किंमत 46 हजारांच्या पातळीवर चालली आहे.
एसपीडीआर गोल्ड ईटीएफच्या होल्डिंगमध्ये 8.1 टन घट झाली आहे. गुरुवारी ते 0.8 टक्क्यांनी कमी होऊन 992.65 टनावर आले आहे. मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचे दर तुम्हाला जर सोन्याचांदीचे दर माहित करून घ्यायचे असतील तुम्ही घरबसल्या हे काम करू शकता.
22 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल. काही वेळात तुमच्या मोबाइल क्रमांकावर मौल्यवान धातूच्या किंमतीबाबत मेसेज येईल. शिवाय सोन्याच्या किंमतीबाबत लेटेस्ट अपडेट्ससाठी तुम्ही www.ibja.com या वेबसाइटला देखील भेट देऊ शकता.
सोन्याची शुद्धता कशी ओळखाल ? २४ कॅरेट सोने सर्वात शुद्ध आहे, पण पूर्ण २४ कॅरेट सोन्याचे दागिने बनविणे शक्य नाही. सामान्यपणे २२ कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो.
ज्यामध्ये ९१.६६ टक्के सोने असते. जर तुम्ही २२ कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की २२ कॅरेट सोन्यामध्ये २ कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित ५ प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम