अहमदनगर Live24 टीम, 26 सप्टेंबर 2021 :- पुण्यात दुचाकी जळीतकांड हे नेहमीच होत असते मात्र असाच काहीसा प्रकार नगर जिल्ह्यातील संगमनेर मध्ये घडला आहे. यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
विशेषबाब म्हणजे एका राजकीय पदाधिकाऱ्याच्या गाड्या पेटवून दिले असल्याने तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे. संगमनेरमध्ये एका भाजप नेत्याच्या दोन दुचाकी व एक चारचाकी वाहन अज्ञान व्यक्तीने पेटवून दिले.
ही घटना संगमनेर शहर पोलिस ठाण्याजवळील नगरपालिका क्रीडा संकुल परिसरातील अभंग मळा या दाट लोकवस्तीत घडली. याबाबत अधिक माहिती अशी कि,
भाजपच्या ओबीसी मोर्चाचे शहराध्यक्ष संपतराव गलांडे यांच्या राहत्या घरासमोर उभ्या केलेल्या दोन दुचाकींसह एक चारचाकी वाहनाला, आज पहाटे साडेचारच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने आग लावली.
या घटनेत तिन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत जागरुक नागरिकांमुळे आग आटोक्यात आल्याने जीवित झाली नाही.
आग लागल्याचे समजताच परिसरातील नागरिकांनी गलांडे कुटूंबियांना जागे करुन घटनेची माहिती दिली. स्थानिकांसह नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली.
या घटनेत गलांडे यांचे सुमारे 11 लाखांचे नुकसान झाले असून, हा घातपाताचा प्रकार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम