खड्ड्यात वृक्षारोपण करत केला सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 27 सप्टेंबर 2021 :- जिल्ह्यातील अनेक रस्ते सध्या खड्डेमय झाले आहे. यामुळे वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यामुळे आता विविध संघटनांसह काही राजकीय पक्ष देखील आक्रमक झाले आहे.

नुकतेच याचेच पडसाद नेवासा तालुक्यात पडले आहे. नेवासा ते शेवगाव महामार्गावर मोठं-मोठाली खड्डे पडली असून रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे. या खड्डयामुळे अनेक अपघात झाले आहेत.

अनेक प्रवाशांना आपला जीव गमवावा लागलेला आहे. नेवासा-शेवगाव रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात वृक्षारोपण करून नेवासा तालुका किसान सभा व नेवासा तालुका काँग्रेसने सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध केला.

सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेक वेळा पाठपुरावा केल्याने नेवासा फाट्याकडून कुकाण्याकडे खड्डे भरण्याचे काम सुरू केले. मात्र हे काम अत्यन्त संथ गतीने व निकृष्ट दर्जाचे होत आहे.

काल भरलेला खड्डा आज पुन्हा उखडलेला दिसून येत आहे. महिन्यापासून सुरू असलेल्या खड्डे भरण्याचे कामाची गती वाढवावी अशी मागणी करण्यात आली.

या मागणी कडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधण्यासाठी आज सकाळी भेंडा येथे बसस्थानक चौक परिसरात नेवासा-शेवगाव रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात किसान सभा व काँग्रेसने वृक्षारोपण केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe