अहमदनगर ब्रेकिंग ! गुरुजीने विद्यार्थिनीसोबतच केले असे काही…

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 28 सप्टेंबर 2021 :- महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यातच अशीच या धक्कादायक घटना नगर जिल्ह्यात घडली आहे.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षकाने पाच ते सहा अल्पवयीन विद्यार्थींनी सोबत अश्लील चाळे केल्याची घटना घडली आहे. एका विद्यार्थींनीच्या पालकाच्या फिर्यादीवरून त्या शिक्षकाविरोधात

नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष एकनाथ माघाडे (वय 34 रा. गंगापूर जि. औरंगाबाद) असे गुन्हा दाखल झालेल्या शिक्षकाचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, संबंधित शिक्षक नगर तालुक्यातील एका प्राथमिक शाळेचा शिक्षक आहे. त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती नगर तालुका पोलिसांनी दिली आहे.

सध्या कोरोनामुळे ऑनलाईन शाळा सुरु आहे. शिक्षक संतोष माघाडे हा ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली विद्यार्थींनीना शाळेत बोलून घेत असे व त्यांच्याशी अश्लील चाळे करत असल्याची बाब समोर आली आहे. विद्यार्थींनी घरी हा प्रकार सांगितल्यानंतर पालकांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe