अहमदनगर Live24 टीम, 28 सप्टेंबर 2021 :- कोरोना महामारीशी मनुष्यांचा लढा सुरु असताना पशुधनांमध्ये देखील रोगराईचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे अनेक जनावरे दगावली आहे. यामुळे पशुपालकांची चिंता वाढली आहे.
यामुळे जनावरांचे लसीकरण हाती घेण्यात आले आहे. यातच नेवासा तालुक्यात तब्बल 21 हजार 530 जनावरांचे लसीकरण आतापर्यंत पूर्ण करण्यात आले आहे.
दरम्यान तालुक्यासाठी लाळ्या-खुरकूत लसीचे 1 लाख 36 हजार डोस प्राप्त झाले आहे. यामुळे लसीकरणाला वेग प्राप्त होणार आहे. एप्रिल 2021 महिन्यात लाळ्याखुरकुत-घटसर्प रोगाची लागण होऊन नेवासा तालुक्यातील 123 जनावरे दगावली होती.
जिल्हा परिषद पशु संवर्धन समितीचे सभापती सुनील गडाख यांनी तातडीने लसीचे 9 हजार डोस मागवून जनावरांचे लसीकरण सुरू केले होते.
तातडीने लसीकरण केल्याने मुळे जनावरांच्या मृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत झाली होती. सध्या जनावरांमध्ये लंपी आजाराची लागण झालेली आढळून आलेले आहे.
त्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधक उपाय योजना म्हणून तालुक्यात लाळ्या खुरकूत लसीचे लसीकरण हाती घेण्यात आलेले आहे. नेवासा तालुक्यात एकूण 1 लाख 52 हजार पशुधन असून त्यांचे लाळ्या खुरकूत लसीकरण हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी लसीचे एकूण 1 लाख 36 हजार डोस प्राप्त झालेले आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम