अहमदनगर Live24 टीम, 28 सप्टेंबर 2021 :- नगरच्या सीना नदीची पूररेषाही शिथिल करण्यात येईल, अशी शक्यता निर्माण झाली आहे. यासाठी जलसंपदामंत्री जयंत पाटील हे बुधवारी (दि.29) नगर दौर्यात सीना नदीची पाहणी करणार असून
त्यानंतर याबाबत सकारात्मक निर्णय होईल अशी अपेक्षा आ. संग्राम जगताप यांनी व्यक्त केली आहे. जलसंपदा विभागाने नगर शहरातून जाणार्या सीना नदीची पूररेषा निश्चित करताना ती वस्तुस्थितीला धरून केलेली नाही.
त्यामुळे नगर शहराच्या विकासावर त्याचा विपरीत परिणाम होणार असून या अन्यायकारक पुररेषेचा फेर सर्व्हे करण्याची मागणी आ. जगताप यांनी मागील महिन्यात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या कडे केली होती.
मागील आठवड्यात मंत्री पाटील यांची आ.जगताप यांनी या विषयासंदर्भात पुन्हा भेट घेवून चर्चा केली होती. त्यावेळी नगर दौर्यावर आल्यावर सीना नदीची पाहणी करून याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे आश्वासन त्यांनी दिले होते.
त्यानुसार मंत्री पाटील हे बुधवारी (दि.29) नगर दौर्यावर येत आहेत. या दौर्यात सीना नदीची वस्तुस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून देणार असल्याचे आ.जगताप यांनी सांगितले.
त्यानुसार बुधवारी (दि.29) मंत्र्यांकडून सीना नदीची पाहणी होणार आहे. पूररेषेबाबतची वस्तुस्थिती त्यांना दाखविली जाणार आहे. त्यामुळे लवकरच पूररेषा कमी होऊन नगरकरांना दिलासा मिळेल, असे आ. जगताप यांनी सांगितले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम