सहकारी बँकांना जाचक निर्बंध लावणे बँकिंगसाठी भविष्यात अडचणीचे ठरणार

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 30 सप्टेंबर 2021 :- रिझर्व बँकेने राष्ट्रीय व खासगी बँकांना मोकळीक दिली मात्र सहकारी बँकांना जाचक निर्बंध लावले. हे बँकिंगसाठी भविष्यात अडचणीचे ठरणार आहे.

मात्र अमृतवाहिनी बँकेने तालुक्यातील शेतकर्‍यांना मोठी मदत केली असे प्रतिपादन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेच्या 39 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.

यावेळी बोलताना थोरात म्हणाले, निर्बंध खाजगी व शासकीय बँकांना लागू नाहीत. काही सहकारी बँकांमध्ये चुकी असेल तर ती शिक्षा नक्की करा मात्र जे चांगले आहे त्यांच्या पाठीशी उभे रहा.

अमृतवाहिनी बँकेने तालुक्याची आर्थिक कामधेनू म्हणून काम करताना शेतकर्‍यांना व तरुणांना मोठी आर्थिक मदत केली आहे. वेळेत कर्ज परत करणे ही परंपरा आपण सर्वांनी जपली पाहिजे. केंद्र सरकारने व रिझर्व्ह बँकेने नव्याने लागू केलेले निर्बंध सहकारी बँकांसाठी अत्यंत कडक आहेत.

काही मूठभर उद्योगपतींना हजारो कोटींचे कर्ज माफ होते आणि पुन्हा ते नव्याने कर्ज घेतात. याकडे मात्र सरकार दुर्लक्ष करते आहे आणि सहकारी बँका या गोरगरिबांच्या प्रपंचाशी निगडित असतात त्यावर मात्र अनेक जाचक निर्बंध लावतात हे मात्र न समजण्यासारखे आहे.

याचवेळी बोलताना आमदार डॉ. सुधीर तांबे म्हणाले, अमृतवाहिनी बँकेने तालुक्यातील शेतकरी, तरुण, उद्योजक यांना सातत्याने मोठी मदत केली आहे.

संगमनेर तालुक्याने कर्जवसुलीची 100% परंपरा कायम राखली आहे. ही संस्था आपली असून प्रत्येकाने वेळेत कर्ज परत केले तर नव्याने पुन्हा ते सर्वांना सुलभतेने घेता येईल. बँकींगचे नियम प्रत्येकाने जपावे असे ते म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe