नगर शहरातील खड्ड्यांमुळे मनपा आयुक्त शंकर गोरे व शहर अभियंता इथापे आले अडचणीत !

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 01ऑक्टोबर 2021 :-  सामाजिक कार्यकर्ता संदीप अशोक भांबरकर यांनी कोर्टात त्यांच्या विरुद्ध केला खाजगी दावा दाखल त्याची सुनावणी 7 /10/ 2019 रोजी संबंधित विषय खालील माहिती संदीप भांबरकर यांनी दिली आहे.

अहमदनगर शहरातील1,2 रोड सोडले तर नगर शहरातील प्रत्येक रोडवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे.त्याविषयी सोशल मीडियावर प्रत्येक नागरिक असो किंवा तरुण वर्ग सोशल मीडियावर ग्रुप निर्माण त्यांच्या प्रभागांमधील खड्ड्यांचे यांचे फोटो काढून पोस्ट करून किंवा इतर वेगवेगळ्या मार्गाचा वापर करून त्यांच्या मनाचं दुःख व्यक्त करत असतात त्याच् अनुषंगाने..

मी स्वतः भारताचा नागरिक या नात्याने समाजातील अपप्रवृत्ती विरुद्ध आवाज उठवण्याचा पूर्ण हक्क व अधिकार मला संविधानाने दिला आहे त्या अधिकाराचा वापर करून मी न्यायालयात योग्यरीत्या दाद मागू शकतो.. म्हणून मी मनपा आयुक्त शंकर गोरे व शहर अभियंता सुरेश इथापे जें मनपाचे जबाबदार अधिकारी तसेच जनतेचे सेवक आहे.

त्यांना जनतेकडून कररूपाने जो पैसा गोळा केला जातो त्यातून दरमहा पगार दिला जातो त्यामुळे पगाराचे मोबदल्यात त्यांना कायद्याने ठरवून दिलेल्या जबाबदारी व काम करणे ही बंधनकारक/अपेक्षित आहेच मनपा हद्दीतील केरकचरा उचलण्याची त्याची विल्हेवाट लावण्याची व शहरातील सर्व रस्ते सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी ही त्यांच्याजवळ असते, परंतु अहमदनगर मनपा हद्दी येणाररें सर्व रोड पाहतात एक हीं रोड योग्य नाही.

प्रत्येक रोडवर मोठय़ाप्रमाणात खड्डे आहे आणि त्यात खड्डामध्ये रोज वेगवेगल्या स्वरूपात अपघात होतात..मुळात ह्या सर्व घटनेला कारणीभूत संबंधित प्रशासकीय अधिकारी हेच जबाबदार आहे. त्याचे कारण ज्या ज्या संबंधित ठेकेदार वर्गाला हे अधिकारी कामे देतात त्यात त्या ठेकेदार व त्यांच्या कामांची गुणवत्ता यांनी तपासणे हे गरजेचे आहे पण तरीहीं हे अधिकारी संबंधित ठेकेदार काम देतात.

त्या कामाचा दर्जा त्याची गुणवत्ता व त्या कामाची लाईक पाहण्याच अधिकार संबंधित अधिकारी वर्गाकडे असतो.तरी तो दर्जा त्याची गुणवत्ता न पाहता त्यांना संबंधित रोड चे कामे दिले जातात… त्याच अनुषंगाने सामजिक कार्यकर्ते संदीप अशोक भांबरकर यांनी adv शिवाजी सांगळे मार्फत जो दावा दाखल केला आहे त्यांतील मागणी हीं आहे कीं संबंधित अधिकारी वर्गाने कर्तव्यात कसूर केली आहेच ,

त्यामुळे त्यांना असा आदेश देण्यात यावा की लवकरात लवकर नगर शहरातील सर्व रोड कायमस्वरूपी मजबूत,पक्के,खड्डेमुक्त व धूळविरहित करण्यात यावे तसेच नागरिकांना उपद्रव होईल अश्या पद्धतीने भविष्यात मातीचा वापर रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी होऊ नये व मनपा मधील अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून

त्यांच्या समस्या मांडण्यासाठी सर्व अधिकार्‍यांची वर्गाचे कार्यालयीन दरवाजे हे कायमस्वरूपी खुलले ठेवण्या यावे जेणे करून त्यांना संबंधित अधिकारी वर्गाची भेट होऊन त्यांच्या समस्या मांडतात येईल. वरील सर्व गोष्टीची कोर्टात बाजू मांडण्यासाठी वकील शिवाजी सांगळे मार्फत केस दाखल करण्यात आली आहे ह्यांची माहिती संदीप भांबरकर यांनी दिली….

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe