मंत्री नितीन गडकरी व ज्येष्ठ नेते शरद पवार एकाच मंचावर दिसणार

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 01ऑक्टोबर 2021 :-  केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहनमंत्री नितीन गडकरी व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार शनिवार (02ऑक्टोबर) रोजी रस्ताकामाचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यासाठी अहमदनगरला येत आहेत.

यानिमित्ताने राजकारणातील दोन मोठे नेतेमंडळी एकाच मंचावर दिसणार आहे. केडगावजवळील सोनेवाडी रस्त्यावर होणाऱ्या कार्यक्रमात ते एकाच व्यासपीठावर असतील.

याबाबतची माहिती भाजपचे नगर शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांनी दिली आहे. नगर जिल्ह्यात पवार व गडकरी या दोन मातब्बर नेत्यांसह शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी व कॉँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते पहिल्यांदाच एका मंचावर येत आहेत.

नगर-करमाळा-टेंभुर्णी या चौपदरी रस्त्यासाठी मोठा निधी, सावळीविहीर ते अहमदनगर रस्त्याच्या रुंदीकरणासाठी ४९६ कोटी, अहमदनगर- भिंगार या १८ किलोमीटर रस्तारुंदीकरणासाठी ३५ कोटी रुपये, तर राष्ट्रीय राखीव निधीमधील कामांसाठी ८४ कोटी रुपये खर्च होत आहे.

या कामांचे भूमिपूजन होणार आहे. अहमदनगर-दौड-वासुंदे फाटा रस्ता मजबुतीकरण, अहमदनगर-कडा-आष्टी-जामखेड रस्ता मजबुतीकरण, नांदूर शिंगोटे ते कोल्हार रस्ता मजबुतीकरण व कोपरगाव-वैजापूर रस्ता मजबुतीकरणाची कामे पूर्ण झाली असून, त्यांचा लोकार्पण सोहळा होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe