अहमदनगर Live24 टीम, 01ऑक्टोबर 2021 :- निवडणुका जिंकायच्या असतील तर पक्षाची संघटना स्थानिक पातळीवर मजबुत असली पाहीजे. पाथर्डी-शेवगावचे हुकलेले गणित सुधारण्यासाठी एकत्रीतपणे काम करा.
शेतक-यांच्या पदरात काहीतरी देण्याची भुमिका सरकार घेईल. तुम्ही जनतेमध्ये रहा जनता तुमच्या सोबत येईल, असा सल्ला जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिला.
पाथर्डी येथील संस्कार भवन येथे राष्ट्रवादीच्या संवाद यात्रेनिमीत्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बोलताना ना. पाटील म्हणाले, भगवान गडाला ‘अ’वर्ग देवस्थानचा दर्जा दिला होता.
बाबांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी गडावर जायचे आहे. भगवानगड पाणी योजना व ताजनापुर योजनासाठी मंत्र्याच्या सोबत बैठक घेवु.
मुळा चारीच्या दुरुस्तीच्या कामासाठी अधिका-यांना सुचना दिल्या आहेत. पाथर्डीत विधानसभेचे गणित जुळले पाहीजे.
त्यासाठी राष्ट्रवादीची संघटना मजबुत करा. शेतक-यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम