अहमदनगर Live24 टीम, 02 ऑक्टोबर 2021 :- भारतात आलेल्या ब्रिटनमधील नागरिकांना भारतात आल्यानंतर 10 दिवसांचे होम क्वारंटाईन अनिवार्य आहे. तसंच भारतात आल्यानंतर कोरोना चाचणीही करावी लागणार आहे.
हा निर्णय अशा वेळी घेण्यात आला आहे की, भारतातील नागरिकांना ब्रिटनमध्ये या प्रक्रियेतून जावे लागत आहे, यामुळे ब्रिटनला जशास तशे उत्तर देण्यात आले आहे.
ब्रिटनमधून भारतात येणाऱ्यांसाठी हे नवीन नियम 4 ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत. हे निर्बंध सर्व ब्रिटिश नागरिकांना लागू होतील.
या प्रवाशांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले असले तरी त्यांचा प्रवासाच्या 72 तास आधीचा कोविड-19 आरटीपीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट अनिवार्य असणार आहे.
तसंच भारतीय विमानतळावर आरटीपीसीआर चाचणी आणि आठ दिवसांनंतर पून्हा चाचणी करावी लागणार आहे. तसेच ब्रिटीश नागरिकांना त्यांच्या घरी किंवा जेथे ते भारतात येणार आहेत तेथे 10 दिवस सक्तीच्या विलगीकरणात राहवं लागणार आहे.
जशाच तसे उत्तर…
खरं तर याची सुरुवात ब्रिटटने केली आहे. कोविडशील्ड लसीचे दोन्ही डोस घेतलेले असले तरी ब्रिटनमध्ये येणाऱ्या भारतीयांसाठी 10 दिवसांच्या विलगीकरणाचा नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
या नियम शिथिल करावा अन्यथा तसंच उत्तर दिलं जाईल असा इशारा भारताकडून देण्यात आला होता. पण ब्रिटनने नियमात कोणताही बदल केला नाही. त्यामुळे अखेर भारतानेही ब्रिटिश नागरिकांसाठी सक्तीचे नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम