शरद पवार आज निलेश लंके यांच्या घरी का गेले ? जाणून घ्या सविस्तर कारण…

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 02 ऑक्टोबर 2021 :-राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष,माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी आज (शनिवार) अचानक आमदार निलेश लंके यांच्या निवासस्थानी येत त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली.

शरद पवार यांच्या या भेटीमुळे लंके परिवाराला आश्चर्याचा सुखद धक्का बसला.संपूर्ण लंकेे कुटुंबिय आणि हंगे ग्रामस्थ पवारांच्या भेटीने भारावून गेले. खासदार पवार नगर येथे कार्यक्रमासाठी आले होते.कार्यक्रम संपल्यानंतर त्यांनी आमदार निलेश लंके यांना ‘आपण तुझ्या घरी जाणार आहोत’ असे सांगितले.

निलेश तुझे राहणीमान साधे आहे हे दिसतेच, पण तू तुझे कुटुंबीय साध्या घरात, साध्या पध्दतीने राहता हे मी ऐकून आहे.मला आज तुझ्या आई वडिलांना, पत्नीला, मुलांना भेटायचे आहे.असे पवार यांनी आमदार लंके यांना सांगितले. आमदार लंके यांच्यासाठी हा सुखद धक्का होता.

त्यांनी तातडीने हंगे येथील ग्रामस्थांशी,कार्यकर्त्यांशी संपर्क साधत खासदार पवार यांच्या स्वागताची तयारी करण्यास सांगितले. अवघ्या अर्ध्या तासातच पवार साहेब गावात येणार हे समजल्यावर ग्रामस्थांची एकच घाई उडाली.फुलांचे आगार म्हणून हंगे गावाची ओळख आहे.

त्यामुळे स्वागतासाठी पोत्यातून फुले आणण्यात आली. गावातील सनई पथकाची जुळवा जुळव करण्यात आली.काही उत्साही कार्यकर्त्यांनी चार किलोमीटर अंतरावरील सुपे येथून भले मोठे पुष्पहार आणले.स्वागताची जंगी तयारी करण्यात आली. खासदार पवार हंगे येथे येणार असल्याचे समजल्यावर पंचक्रोशीतील गावांमधून अनेक जण हंगे येथे आले.

गावात मोठी गर्दी जमली.निरोप मिळाल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पवारांच्या वाहनांचा ताफा हंगे येथे आला. ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले.सनई चौघड्याच्या मंजूळ सुरावटीत व ढोल ताशांच्या कडकडाटात खासदार पवार यांच्यावर मोठ्या प्रमाणात पुष्पवृष्टी करण्यात आली.

खासदार पवार यांनी आमदार लंके यांच्या अत्यंत साध्या घराला भेट देत आमदार लंके यांचे वडील ज्ञानदेव लंके,आई शकुंतलाबाई,पत्नी जिल्हा परिषदेच्या सदस्या राणीताई लंके,बंधू दीपक यांच्याशी मनमोकळी चर्चा केली. अगदी पाऊस पाणी, परिसरातील पीक पध्दती याविषयी गप्पा मारल्या.

अवघ्या पंधरा मिनीटांची, परंतू लंकेे कुटुंबियांच्या कायमस्वरूपी स्मरणात राहील अशी कौटुंबिक भेट आटोपून खासदार पवार पुण्याकडे रवाना झाले.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष,माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी आज (शनिवार) अचानक आमदार निलेश लंके यांच्या निवासस्थानी येत त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली.

शरद पवार यांच्या या भेटीमुळे लंके परिवाराला आश्चर्याचा सुखद धक्का बसला.संपूर्ण लंकेे कुटुंबिय आणि हंगे ग्रामस्थ पवारांच्या भेटीने भारावून गेले. खासदार पवार नगर येथे कार्यक्रमासाठी आले होते.कार्यक्रम संपल्यानंतर त्यांनी आमदार निलेश लंके यांना ‘आपण तुझ्या घरी जाणार आहोत’ असे सांगितले.

निलेश तुझे राहणीमान साधे आहे हे दिसतेच, पण तू तुझे कुटुंबीय साध्या घरात, साध्या पध्दतीने राहता हे मी ऐकून आहे.मला आज तुझ्या आई वडिलांना, पत्नीला, मुलांना भेटायचे आहे.असे पवार यांनी आमदार लंके यांना सांगितले. आमदार लंके यांच्यासाठी हा सुखद धक्का होता.

त्यांनी तातडीने हंगे येथील ग्रामस्थांशी,कार्यकर्त्यांशी संपर्क साधत खासदार पवार यांच्या स्वागताची तयारी करण्यास सांगितले. अवघ्या अर्ध्या तासातच पवार साहेब गावात येणार हे समजल्यावर ग्रामस्थांची एकच घाई उडाली.फुलांचे आगार म्हणून हंगे गावाची ओळख आहे.

त्यामुळे स्वागतासाठी पोत्यातून फुले आणण्यात आली. गावातील सनई पथकाची जुळवा जुळव करण्यात आली.काही उत्साही कार्यकर्त्यांनी चार किलोमीटर अंतरावरील सुपे येथून भले मोठे पुष्पहार आणले.स्वागताची जंगी तयारी करण्यात आली. खासदार पवार हंगे येथे येणार असल्याचे समजल्यावर पंचक्रोशीतील गावांमधून अनेक जण हंगे येथे आले.

गावात मोठी गर्दी जमली.निरोप मिळाल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पवारांच्या वाहनांचा ताफा हंगे येथे आला. ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले.सनई चौघड्याच्या मंजूळ सुरावटीत व ढोल ताशांच्या कडकडाटात खासदार पवार यांच्यावर मोठ्या प्रमाणात पुष्पवृष्टी करण्यात आली.

खासदार पवार यांनी आमदार लंके यांच्या अत्यंत साध्या घराला भेट देत आमदार लंके यांचे वडील ज्ञानदेव लंके,आई शकुंतलाबाई,पत्नी जिल्हा परिषदेच्या सदस्या राणीताई लंके,बंधू दीपक यांच्याशी मनमोकळी चर्चा केली. अगदी पाऊस पाणी, परिसरातील पीक पध्दती याविषयी गप्पा मारल्या.

अवघ्या पंधरा मिनीटांची, परंतू लंकेे कुटुंबियांच्या कायमस्वरूपी स्मरणात राहील अशी कौटुंबिक भेट आटोपून खासदार पवार पुण्याकडे रवाना झाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe