अहमदनगर Live24 टीम, 02 ऑक्टोबर 2021 :- राहुरी शहरातील खाटीक गल्ली येथे एका घरात जनावरांची कत्तल होत आहे. असे सांगून दोघेजण एकाच्या घरात घुसले व त्यांनी घरात घुसून महिलांना मारहाण केल्याची घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी प्रसाद मधुकर गाडे व आबा नाईकवाडे हे दोन तरूण राहुरी पोलीस ठाण्यात आले आणि शहरातील खाटीक गल्ली येथे एका घरात जनावरांची अमानुषपणे कत्तल होत आहे.
अशी माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर ते दोघे खाटीक गल्ली येथील अझीम रज्जाक सय्यद यांच्या घरात अनाधिकृतपणे घुसले. यावेळी सय्यद यांच्या घरातील महिला नमाज पठण करत होत्या.
त्यावेळी त्यांनी महिलांना धक्काबुक्की करून तुमच्या घरात जनावरांची कत्तल होते. असे म्हणून पैशाची मागणी केली. तसेच त्यांच्या अंगावरील दागिने ओरबडण्याचा प्रयत्न केला.
अशी माहिती सय्यद यांच्या घरातील महिलांनी दिली. यावेळी जमलेल्या तरूणांनी प्रसाद गाडे व आबा नाईकवाडे यांची धुलाई करत त्यांना पोलीस ठाण्यात दिले. याबाबत पोलिसांत गाडे व नाईकवाडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम