अहमदनगर Live24 टीम, 03 ऑक्टोबर 2021 :- आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिज तेलाचे दर सातत्याने वाढत असल्यामुळे भारतात सलग चौथ्या दिवशी पेट्रोल (Petrol)-डिझेल (Diesel)च्या दरात वाढ झाली आहे.
सरकारी पेट्रोलियम कंपन्यांकडून रविवारी इंधनाचे नवे दर जाहीर करण्यात आले. त्यानुसार पेट्रोलच्या दरात 25 पैसे तर डिझेलची किंमत 29 पैशांनी वाढली आहे. हे दर आज दिवसभरासाठी लागू राहतील. गेल्या नऊ दिवसांमध्ये पेट्रोल 1.05 रुपयांनी महागले आहे. तर डिझेलची किंमत 2.09 रुपयांनी वाढली आहे.
महानगरांमधील आजचे नवीनतम दर जाणून घ्या :-
– आता दिल्लीत 1 लीटर पेट्रोलची किंमत 102.39 रुपये आहे. त्याच वेळी, डिझेल 90.77 रुपये प्रति लिटर उपलब्ध आहे.
– आता कोलकातामध्ये 1 लीटर पेट्रोलची किंमत 103.07 रुपये आहे. त्याच वेळी, डिझेल 93.87 रुपये प्रति लिटर आहे.
– आता मुंबईत 1 लीटर पेट्रोलची किंमत 108.43 रुपये आहे. त्याच वेळी, डिझेल 98.48 रुपये प्रति लिटर आहे. – आता चेन्नईमध्ये 1 लीटर पेट्रोलची किंमत 100.01 रुपये आहे. त्याचबरोबर डिझेल 95.31 रुपये प्रति लिटर आहे.
असे ठरवतात किंमत – परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत यावर आधारित पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात. याच्या आधारे तेल कंपन्या दररोज पेट्रोल दर आणि डिझेल दर निश्चित करण्याचे काम करतात.
पेट्रोलमध्ये किती आहे टॅक्स ? आपण पेट्रोल आणि डिझेलसाठी जी किहीम मोजता त्यापैकी पेट्रोलसाठी 55.5 टक्के आणि डिझेलसाठी 47.3 टक्के टॅक्स भरत आहात.
पेट्रोल पंप डीलरचे कमीशन महाग करते इंधन :- डीलर्स म्हणजे पेट्रोल पंप चालवतात ते लोक. ते कर आणि त्यांचे स्वतःचे मार्जिन जोडल्यानंतर ग्राहकांना त्या दराने पेट्रोल स्वत: विकतात. पेट्रोल दर आणि डिझेल दरामध्येही ही किंमत जोडली जाते.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम