अहमदनगर ब्रेकिंग : दुचाकीला ट्रकची धडक, महिला ठार

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 03 ऑक्टोबर 2021 :- नगर-मनमाड मार्गावरील राहुरी फॅक्टरी परिसरातील वाणी मळा येथे दुचाकी व मालवाहतूक ट्रकच्या अपघातात दुचाकीवरील महिला ठार झाली.

वाणी मळा येथील दूध उत्पादक शेतकरी प्रभाकर खांदे हे पत्नी विमल यांचेसह शनिवारी दुपारी दुचाकीववरून आश्वि (ता.संगमनेर) येथे मुलीच्या घरी चालले हाेते.

धनलक्ष्मी ट्रॅक्टर्सजवळ पाठीमागून आलेल्या मालवाहतूक ट्रकने खांदे यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत दुचाकीवर मागे बसलेल्या विमल खांदे (४२) या जागीच ठार झाल्या.

तर प्रभाकर खांदे किरकोळ जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती समजताच नगरसेवक ज्ञानेश्वर वाणी, संदीप वरखडे, संजय वाणी, पवन उर्हे, तसेच वाणी, वरखडे, खांदे वस्ती परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe