पेट्रोल -डिझेल च्या किमतीच्या वाढीस ब्रेक , जाणून घ्या आजचे दर

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 04 ऑक्टोबर 2021 :- गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या पेट्रोल (Petrol)-डिझेल (Diesel)च्या दरवाढीला अखेर ब्रेक लागला आहे. भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी सोमवारी इंधनाच्या दरात कोणतेही बदल केलेले नाहीत.

यापूर्वी रविवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे 25 आणि 30 पैशांची वाढ करण्यात आली होती. पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा हा वेग पाहता सामान्यांना पुन्हा एकदा धडकी भरली होती.

गेल्या दहा दिवसांमध्ये पेट्रोल 1.05 रुपयांनी महागले आहे. तर डिझेलची किंमत 2.09 रुपयांनी वाढली आहे. महानगरांमधील आजचे नवीनतम दर जाणून घ्या आता दिल्लीत 1 लीटर पेट्रोलची किंमत 102.39 रुपये आहे.

त्याचबरोबर 1 लीटर डिझेल 90.77 रुपये प्रति लिटर आहे. आता कोलकातामध्ये 1 लीटर पेट्रोलची किंमत 103.07 रुपये आहे. त्याच वेळी, 1 लीटर डिझेल 93.87 रुपये प्रति लिटर आहे.

आता मुंबईत 1 लीटर पेट्रोलची किंमत 108.43 रुपये आहे. त्याच वेळी, 1 लिटर डिझेल 98.48 रुपये प्रति लिटर आहे. आता चेन्नईमध्ये 1 लीटर पेट्रोलची किंमत 100.01 रुपये आहे. त्याचबरोबर 1 लीटर डिझेल 95.31 रुपये प्रति लिटर आहे.

असे ठरवतात किंमत – परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत यावर आधारित पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात. याच्या आधारे तेल कंपन्या दररोज पेट्रोल दर आणि डिझेल दर निश्चित करण्याचे काम करतात.

पेट्रोलमध्ये किती आहे टॅक्स ? आपण पेट्रोल आणि डिझेलसाठी जी किहीम मोजता त्यापैकी पेट्रोलसाठी 55.5 टक्के आणि डिझेलसाठी 47.3 टक्के टॅक्स भरत आहात.

पेट्रोल पंप डीलरचे कमीशन महाग करते इंधन :- डीलर्स म्हणजे पेट्रोल पंप चालवतात ते लोक. ते कर आणि त्यांचे स्वतःचे मार्जिन जोडल्यानंतर ग्राहकांना त्या दराने पेट्रोल स्वत: विकतात. पेट्रोल दर आणि डिझेल दरामध्येही ही किंमत जोडली जाते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe