अहमदनगर Live24 टीम, 04 ऑक्टोबर 2021 :- दिवसेंदिवस महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. माणूस माणुसकी विसरत जात असून हिंसक पशु बनत जाऊ लागला आहे. यामुळे महिलांचे अस्तित्वच धोक्यात येऊ लागले आहे.
नुकतेच अशीच एक संतापजनक घटना संगमनेरात घडली होती. बापानेच मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. पोटच्या गोळ्यावर शारीरिक अत्याचार करणाऱ्यावर कडक कारवाई व्हावी.
विकृतीचा नायनाट करण्याची आज आवश्यकता आहे, अन्यथा अशा घटना वारंवार घडण्याची शक्यता आहे, असा संताप महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी व्यक्त केला.
संगमनेर शहर पोलिस ठाण्यास भेट देऊन त्यांनी, अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणाची माहिती घेतली. या घटनेवर बोलताना त्या म्हणाल्या, ‘‘या खटल्याचे कामकाज फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्याची मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेस करीत आहे.
पीडितेला लवकर न्याय मिळाला तरच अशा विकृत प्रवृत्तीला जरब बसेल. हे कायद्याचे राज्य आहे. पोलिस त्यांचे काम चोख करीत आहेत. बापाला मुलीचे नाते समजत नसेल, तर अशा वाईट प्रवृत्तींचा समाजघटकांनी एकत्र येऊन नाश करण्याची गरज आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम