अहमदनगर Live24 टीम, 04 ऑक्टोबर 2021 :- संघर्ष करणारी दोन माणसं एकत्र आली तर त्यांना एकमेकांविषयी आपुलकी वाटते. आपलीच एक प्रतिकृती सामान्य माणसांसाठी लढते, याचा मला सार्थ अभिमान आहे. मी मंत्रालयात असो वा परळीत, मला त्यांच्या कामाचे कौतुक वाटते.
आ. लंके यांना लोकमान्यता मिळाल्यानेच त्यांना सर्वजण ‘नेते’ म्हणून संबोधतात, असे राज्याचे विधी व न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले. वाडेगव्हाण येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी बोलताना ना. मुंडे म्हणाले, आ. लंके यांच्या पक्षप्रवेशाला मी उपस्थित होतो. जीवनात मी अनेक सभा पाहिल्या मात्र लंके यांच्या प्रवेशाची सभा नेहमीच स्मरणात राहील.
आ. लंके तुम्ही खरोखरच भाग्यवान आहात! तुमचं व माझं सारखंच आहे. फक्त माझ्या नावात दम आहे. मलाही तुमच्या सारखाच संघर्ष करावा लागला, असे ते म्हणाले. शरद पवार यांचा ५५ वर्षांचा राजकीय प्रवास पाहिला तर शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेले काम त्यांनी केले असल्याचे कृतीतून दिसून येते.
अठरा पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. महिलांना संधी दिली. मराठा आरक्षणावरून महाविकास आघाडीला दोष दिला जातोय. परंतू न्यायालयात साक्ष पुरावे भाजपाच्या सरकारच्या काळात झाले, निकाल मात्र आमच्या काळात लागला, मग आम्ही दोषी कसे, असा सवाल त्यांनी केला.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम