कोरोनामुक्त शिर्डीसाठी नगरपंचायतने राबवली ‘ही’ मोहीम..!

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 04 ऑक्टोबर 2021 :- शिर्डी नगरपंचायत आणि राहाता ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून शहरात सुरू करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेतून कोरोनामुक्त शिर्डी करण्याचा संकल्प असून मंदिर सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक हॉटेल व्यावसायिकाने कर्मचाऱ्यांचे लसीकरण सक्तीने करून घेण्याच्या सूचना माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या.

शिर्डी शहरातील नागरीकांचे लसीकरण पूर्ण करून घेण्यासाठी नगरपंचायतीने विशेष मोहीम सुरू केली आहे. शहरातील आदर्श माध्यमिक विद्यालयात सुरू असलेल्या लसीकरण केंद्राला आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेट देऊन नागरीकांशी संवाद साधला.

यावेळी ते म्हणाले की,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात मोफत लस उपलब्ध करून दिल्यानंतर आजपर्यंत देशातील ९० कोटीहून अधिक नागरीकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. येत्या काही दिवसात लसीकरणाचा आकडा शंभर कोटींवर जाईल. सर्वाधिक नागरीकांचे लसीकरण पूर्ण करणारा देश म्हणून भारत ओळखला जाईल.

पंतप्रधानांनी उपलब्­ध करुन दिलेली मोफत लस नियोजनपूर्वक नागरीकांना मिळावी यासाठी शिर्डी नगरपंचायत आणि राहाता ग्रामीण रुग्णालय यांनी विशेष पुढाकार घेवून ही मोहीम सुरु केली आहे. या माध्यमातून कोरोनामुक्त शिर्डी करण्याचा प्रयत्न असल्याचे आ.विखे पाटील म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe