अहमदनगर Live24 टीम, 04 ऑक्टोबर 2021 :- पुण्यात अचानक वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली आहे. काही भागांमध्ये पाणी साचले आहे.
प्रशासनाने नागरिकांना घरातून बाहेर न निघण्याचे आवाहन केले आहे. तसेच पुणे शहरातील पडणाऱ्या पावसाचा प्रचंड वेग लक्षात घेता आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला योग्य त्या सूचना देण्यात आल्यात.
राज्यात पुढच्या 4 ते 5 दिवसांत काही ठिकाणी गडगडाटासहीत जोरदार पावसाची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यात हवामान खात्याकडून येत्या दोन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलीय.
पुणे जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन तासांपासून जोरदार अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे पुणेकरांनी घराबाहेर पडू नका, अशा सूचनाही हवामान विभागाकडून देण्यात आल्यात.
मी स्वतः परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेऊन आहे. आपण लवकरात लवकर घरी पोहोचा आणि घरी असाल तर बाहेर पडणे टाळा, असं आवाहन महापौर मोहोळ यांनी केलं आहे.
पुणे शहरातील पडणाऱ्या पावसाचा प्रचंड वेग लक्षात घेता आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत. सर्व यंत्रणा सज्ज आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम