अहमदनगर Live24 टीम, 05 ऑक्टोबर 2021 :- सोमवारी राहाता बाजार समितीत चार हजाराहून अधिक कांदा गोण्यांची आवक झाली आहे. दरम्यान यावेळी कांद्याला सर्वाधिक 4100 रुपये भाव मिळाला तर डाळिंबाला 278 रुपये भाव मिळाला आहे.
जाणून घ्या कांद्याला कसा भाव मिळाला… राहाता बाजार समितीत 4496 गोणी कांद्याची आवक झाली. यामध्ये कांदा नंबर 1 प्रति क्विंटलला 3500 ते 4100 असा भाव मिळाला.
तर 2 नंबर कांदाला 2550 ते 3450 असा भाव मिळाला. 3 नंबर कांद्याला 1300 ते 2500 रुपये इतका भाव मिळाला. गोल्टी कांदा 2400 ते 2600 व जोड कांदा 400 ते 1300 रुपये भाव मिळाला.
डाळिंबाला ‘हा’ दर मिळाला राहाता बाजार समितीत सोमवारी डाळिंबाची 11451 क्रेट्सची आवक झाली. प्रति किलोला डाळिंब नंबर 1 ला 151 ते 278 इतका भाव मिळाला.
डाळिंब नंबर 2 ला 96 ते 150 रुपये इतका भाव मिळाला. डाळिंब नंबर 3 ला 46 ते 95 रुपये व डाळिंब नंबर 4 ला 10 ते 45 रुपये असा भाव मिळाला आहे.
दरम्यान राज्यासह जिल्ह्यात पुन्हा एकदा आस्मानी संकट घोंगावू लागले आहे. याचा परिणाम पिकांवर होऊ शकतो. यामुळे बळीराजा देखील हातात असलेला माल बाजार समित्यांमध्ये दाखल करू लागला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम