बेपत्ता असलेला ‘त्या’ युवकाचा मृतदेह मुळानदीत आढळून आला

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 05 ऑक्टोबर 2021 :-  राहुरी तालुक्यातील कोंढवड येथून दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका युवकाचा मृतदेह चंडकापूर शिवारात मुळानदीत आढळून आला असल्याची धक्कादायकबाब उघडकीस आली आहे.

शुभम बापूसाहेब म्हसे असे मयत युवकाचे नाव आहे. तो गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होता अशी माहिती मिळते आहे. दरम्यान याबाबत अधिक माहिती अशी कि,

कोंढवड येथील शुभम म्हसे हा महाविद्यालयीन युवक शुक्रवार दि. 1 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजता कुणाला काहीही न सांगता घरातून निघून गेला.

त्यानंतर त्याचा शोध घेतला मात्र तो सापडला नसल्याने नाईलाजाने नातेवाईकांनी पोलिसांत धाव घेतली. राहुरी पोलीस ठाण्यात शुभम बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविण्यात आली.

पोलिसांनी शुभमच्या मोबाईलचे लोकेशन शोधले. कोंढवड येथे मुळा नदी काठावरील लक्ष्मीआई मंदिराजवळ शुभमच्या मोबाईलचे लोकेशन आढळले.

तेथे शुभमचा मोबाईल व चपला आढळून आल्या. दोन दिवसांपासून मुळा नदी पात्रातील पाण्यात शुभमचा शोध सुरू होता. रविवारी दुपारी अडीच वाजता शुभमचा मृतदेह चंडकापूर थडीला नदीच्या पाण्यावर तरंगताना आढळला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe