अहमदनगर Live24 टीम, 05 ऑक्टोबर 2021 :- ऐन सणासुदीच्या काळात लॉकडाऊन केल्यामुळे गावातील अत्यावश्यक सेवा वगळता ,पतसंस्था,किराणा दुकान, कृषिपुरक दुकाने हे व्यवसाय हे बंद करण्यात आल्याने व्यावसायिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून यावर तोडगा काढू जर चर्चेतून मार्ग निघला नाही तर मात्र रस्त्यावर उतरावे लागेल अस इशारा श्रीगोंद्याचे माजी आमदार राहुल जगताप यांनी दिला. ते म्हणाले की, श्रीगोंदा तालुक्यातील नऊ गावात १० पेक्षा जास्त रुग्ण संख्या असल्याने त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने लॉकडाऊन करण्यात आले आहे.
ऐन सणासुदीच्या काळात लॉकडाऊन केल्यामुळे गावातील व्यावसायिकासह सर्वसामान्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मागील लॉकडाऊनच्या काळात व त्यानंतर आलेल्या दुसऱ्या लाटेत नागरिकांचे प्रचंड हाल झालेले आहेत.
आता काही प्रमाणात परिस्थिती पूर्वपदावर येत असतानाच परत लॉकडाऊन केल्याने शेतकऱ्यांसह व्यापारी देशोधडीला लागतील.त्यामुळे व्यापारी ,शेतकरी, कामगार, मजूर यांच्या समस्या विषयी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून या बंद विषयी मार्ग काढणार आहोत. जर याबाबत चर्चेतून मार्ग निघाला नाही तर आपण रस्त्यावर उतरू असे त्यांनी सांगितले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम