Ahmednagar News : विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी लाच मागणारा ‘एसीबी’च्या जाळ्यात

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 05 ऑक्टोबर 2021 :- विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी लाच मागणारा एकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले आहे. पांडू पुनाजी मावळी, (वय- 36 वर्ष, कनिष्ठ अभियंता, लिंपनगाव, ता- श्रीगोंदा,) असे लाचखोराचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीगोंदा तालुक्यातील लिंपणगाव ग्रामपंचायतच्या पाणीपुरवठा विभागाचे वीजबिल थकल्याने वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता.

त्यामुळे गावातील पाणीपुरवठा बंद झाला होता लिंपनगाव ग्रामपंचायत चे विद्युत बील थकलेले असलेमुळे म.रा.वि.वि कंपनी कडून ग्रामपंचायत चे विद्युत कनेक्शन तोडले होते.

आरोपी पांडू पुनाजी मावळी, (वय- 36 वर्ष, कनिष्ठ अभियंता, वर्ग- 3 म.रा.वि.वि कं, लिंपनगाव (काष्टी 2.सेक्शन) ता- श्रीगोंदा,)यांनी विद्युत कनेक्शन तोडले मुळे गावाचा पाणिपुरवठा बंद होत असल्याने

तक्रारदार यांनी यातील आरोपी यांची भेट घेऊन विद्युत पुरवठा सुरळीत सुरू करुन देणेबाबत विनंती केली. दरम्यान आरोपीने त्यांच्या कडे ₹ 20,000/- ची मागणी केली.

तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिलेल्या तक्रारीवरून आज रोजी केलेल्या लाच मागणी पडताळणी मध्ये आरोपी यांनी ₹ 15,000/- ची मागणी पंचासमक्ष करून सदर लाच रक्कम

आज रोजी आयोजित केलेल्या सापळा कारवाई दरम्यान पंचासमक्ष हॉटेल श्रावणी, लिपंनगाव येथे स्विकारली असता आरोपी यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe