नगर तालुक्यातील ‘या’गावात झाले१००टक्के लसीकरण

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 06 ऑक्टोबर 2021 :- आदर्श गाव हिवरे बाजार येथे लसीकरणाचा नववा टप्पा पूर्ण होऊन आज हिवरे बाजार गावाचे कोविड -१९ लसीकरण १०० टक्के पूर्ण झाले. मतदार यादीनुसार हिवरे बाजार मधील १८वर्षाच्या पुढील एकूण ८९७ व्यक्ती लसीकरणासाठी पात्र होत्या.

त्या सर्व व्यक्तीचे लसीकरण करण्यात आले. पद्मश्री पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आदर्श गाव हिवरे बाजार येथे १०० टक्के लसीकरण यशस्वीपणे पार पडले.

याप्रसंगी उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी हिवरे बाजार येथील लसीकरण केंद्राला भेट देऊन ग्रामस्थांशी समक्ष चर्चा केली.

जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संदीप सांगळे यांनीही लसीकरण बाबत भेट देऊन कोविड -१९ लसीकरण बाबत मार्गदर्शन केले

तसेच नगर तालुक्याचे तहसीलदार उमेश पाटील यांनी एकत्रित लसीकरण कामकाजाचा आढावा घेतला आणि ज्या व्यक्ती अपंग किंवा जास्त वय झालेले असेल अशा व्यक्ती लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर येऊ शकत नाही अशा व्यक्तीच्या घरी जाऊन लसीकरण करण्यात आले.

यासाठी विशेष सहकार्य व समन्वयाची भूमिका डॉ.शिवानी देशपांडे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र हिवरे बाजार व त्यांचे सर्व सहकारी तसेच डॉ.दुर्गा बेरड प्राथमिक आरोग्य केंद्र टाकळी खातगाव,संतोष पाखरे तलाठी, विमल ठाणगे सरपंच हिवरे बाजार यांचे लाभले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe