कांद्याच्या वाढीव दराने शेतकऱ्यांच्या डोळ्यात आनंद आश्रू…

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 06 ऑक्टोबर 2021 :- नेहमीच कोसळणाऱ्या दराने शेतकऱ्यांच्या डोळ्यात आश्रू आणणाऱ्या कांद्याचे दर वाढल्याने शेतकरी वर्गामध्ये समाधानकारक वातावरण पाहायला मिळते आहे.

कांद्याच्या भावात तेजी आली असून कांद्याचे दर 4000 ते 4500 रुपये प्रति क्विंटलवर गेले आहे. राज्याच्या विविध भागात कांद्याचे दर वाढले आहेत सोलापुरात तर लाल कांद्याची आवक झाली.

1 नं.च्या कांद्याला तब्बल 4500 रूपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. कांद्याच्या भावात तेजी आल्याने कांदा उत्पादक सुखावला आहे. पण गृहिणींचे बजेट कोसळणार आहे.

जिल्ह्यातील राहुरीत उन्हाळ कांद्याला मंगळवारी 500 ते 3500 रुपये प्रति क्विंटल, कोपरगावात 600 ते 3700 रुपये, तर राहात्यात सर्वाधिक 400 ते 4100 रुपयांचा दर मिळाला.

श्रीरामपुरात सोमवारी 600 ते 4000 रुपयांचा भाव मिळाला होता. श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टाकळीभान उपबाजारात कांदा चांगलाच वधारला आहे.

मंगळवारी 1 नंबर कांद्याला 3900 रुपयाचा दर मिळाला. दोन नंबरला 2 हजार 600 ते 3 हजार 200 रुपये, तीन नंबरला 500 ते 1 हजार 500 रुपये तर गोल्टी कांद्याला 2 हजार ते 2 हजार 700 रुपयाचा दर मिळाला. कांदा भाव वाढल्याने शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावर समाधान दिसुन येत होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe