अहमदनगर Live24 टीम, 06 ऑक्टोबर 2021 :- अलीकडे सोशल मीडियावरील’ओ शेठ’हे गाणे प्रतेकजण गुणगुणत आहे. मात्र काल कर्जत शहरातील प्रतिष्ठित आडत व्यापार्याकडे काम करणार्या दोन हमालांनीच व्यापार्याच्या मुलाने बँकेतून काढून आणलेली दहा लाख रूपयांची रोकड हिसकावून पळवुन नेल्याची घटना घडली.
ओ शेठ ! १०लाखांना लावलाकी चुना थेट..अशी म्हणण्याची वेळ आली आहे. या प्रकरणी पियुष रवींद्र कोठारी (20) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार सोमनाथ विठ्ठल साळुंके, प्रमोद विजय आतार दोघे (रा. कोरेगाव, ता. कर्जत) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येथील मार्केट यार्ड येथील अडत व्यापारी रवींद्र कोठारी यांनी शेतकर्यांच्या खरेदी केलेल्या मालाचे पैसे द्यायचे असल्याने कर्जत शहरातील नगर अर्बन बँकेच्या शाखेमधून दहा लाख रुपये काढून आणण्यास मुलगा पियुष यास सांगितले,
दरम्यान त्यांच्याच अडत दुकानांमध्ये हमाली काम करत असलेल्या सोमनाथ साळुंके व प्रमोद आतार आमचे गावामध्ये काम आहे ते करून परत आलो असे म्हणून मार्केट यार्डाच्या बाहेर रस्त्यावर येऊन थांबले.
दरम्यान बँकेमधून दहा लाख रुपये काढून बॅगमध्ये ठेवून दुचाकीवरून पियुष मार्केट यार्ड कडे येत असताना संशयितांनी त्यास रस्त्यातच हाक मारली व गाडी थांबवण्यास सांगितले,
आपल्याच दुकानातील हमाल हाका मारत असल्यामुळे त्यांच्याजवळ पियुष थांबला असता त्यांनी पियुषच्या दुचाकीला अडकवलेली पैशाची बॅग हिसकावली व दुचाकीवरून पळून गेले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम