Healthy Life : कायम तरुण दिसण्याचे खास उपाय

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 06 ऑक्टोबर 2021 :- आयुष्यात कायम आशावादी बनून राहा. स्त्रियांनी प्रत्येक काम आवडीने आणि मन लावून केले पाहिजे आणि प्रत्येक गोष्टी बद्दल सकारात्मक भावना राखली पाहिजे.

» आपले शरीर आणि कपडे यांच्या स्वच्छतेवर काटेकोरपणे लक्ष द्या. त्वचेची साफसफाई हाच खरा चिरतारुण्याचे उपाय आहे.

» रात्री झोपण्यापूर्वी चेहण व मान एखाद्या क्लिजिंग मिल्कने स्वच्छ करा आणि सकाळी उठल्यावर कोमट पाण्याने चेहरा धुवावा. या नंतर एखाद्या माईल्ड सोपने चेहरा धुवावा.

» आठवड्यातून कमीत कमी दोन वेळा केस धुवावेत.

» आपले हात आणि नखे चांगल्या प्रकारे स्वच्छ करावीत.

» दिवसातून २ वेळा नियमितपणे दातांना ब्रश करावा. स्वत:बद्दलच्या स्वच्छतेची काळजी आपल्यात आत्मविश्‍वास वाढविण्याचे काम करते.

» सतत काही ना काही खाऊ नये. जेवणानंतर भरपूर पाणी प्यावे.

» रागावर नियंत्रण ठेवा. लहान लहान गोष्टी वरून, अपयशावरून चिडचिड करू नये. अडचणींमुळे त्रस्त होऊ नये. प्रत्येकाबद्दल सकारात्मक विचार करावा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe